विशाल करोळे / औरंगाबाद : मराठवाडा ( Marathwada ) सध्या बर्ड फ्लूचं (bird flu)  केंद्र झाले आहे. परभणी, (Parbhani) लातूर, (Latur) बीडमध्ये (Beed) 3000 पेक्षा जास्त पक्ष्यांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. 16 ते 17 हजार कोंबड्यांना जिवंतपणे पुरण्यात आले आहे. त्यामुळे अख्खा मराठवाडा अलर्टवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाड्यात मृत पक्ष्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. गेल्यावेळी महाराष्ट्रात बर्ड फ्लू घुसला तो नंदुरबारमधल्या नवापूरमधून. यावेळी मात्र बर्ड फ्लूने मराठवाड्याकडे मोर्चा वळवला आहे. आठवडाभरात परभणी, लातूर आणि बीडमध्ये हजारो पक्षी बर्ड फ्लूनं मेले आहेत.


कोठे किती पक्षी, कोंबड्यांचा मृत्यू?


परभणीत जवळपास १५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. 
तर साडे पाच हजार कोंबड्यांना जिवंतपणी पुरण्यात आलं. 
लातूरच्या केंद्रेवाडी आणि सुकणीमध्ये जवळपास साडे तीनशे कोंबड्या मेल्या.
लातूरमध्ये आतापर्यंत ११ हजारांच्यावर कोंबड्या मारण्यात आल्यायत. 
बीडमध्ये कावळे आणि काही पक्षी मृत सापडलेत 
नांदेडमध्ये बिलोली, हिमायत नगर आणि झळकवाडीत कोंबड्यांसह साडे चारशे पक्ष्यांचा मृत्यू झाला. 
 
औरंगाबाद, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अजून तरी बर्ढ फ्लू शिरलेला नाही. मात्र जायकवाडी धरणाच्या बँक वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षी येतात. त्यांच्याकडून बर्ड फ्लूचा धोका आहे. त्यामुळेच बर्ड फ्लू रोखण्यासाठी जायकवाडी क्षेत्रात विशेष पथक सज्ज आहे. 


मराठवाड्यात चार जिल्ह्यांना बर्डफ्लूनं घेरले आहे. ज्या कोंबड्या मृत आढळल्या आहेत, त्या गावरान कोंबड्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर पोल्ट्री फार्मसना धोका नाही, असं तज्ज्ञ सांगत आहेत. मराठवाड्यात येणारे स्थलांतरित पक्षी रोखणं हे मोठे आव्हान आहे. प्रशासन सज्ज आहे. पण तुम्हीही योग्य ती खबरदारी घ्या.