मुंबई : मनसुख हिरेनप्रकरणात नवा खुलासा समोर येत आहे. आधी आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मनसुख यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा किंवा व्रण नसल्याचं समोर आलेलं. मात्र आता विस्तृत आलेल्या शवविच्छेदन अहवालात मनसुख यांच्या शरीरावर काही खुणा असल्याचा उल्लेख आहे. पण या खुणा कधीच्या आहेत, हे मात्र कळू शकलेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विस्तृत पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आहे? 


मनसुख यांच्या चेहऱ्याच्या नागपुडीजवळ दीड सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरती लाल खूण आहे. चेह-याच्या उजव्या बाजूकडील गालावर ८ सेंटीमीटर बाय ३ सेंटीमीटर एवढी मोठी गडद लाल रंगाची खूण आहे. इतकंच नाही तर उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खूण आहे.


संध्याकाळी आलेल्या मनसुख हिरेन यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणताही घातपात नसल्याचा उल्लेख तसंच शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याची माहिती समोर आलेली. मात्र आता विस्तृत अहवालानुसार शरीरावर काही खुणा असल्याचं उघडकीस आलं आहे. पण या खुणा त्यांचा मृत्यू झाला त्यावेळच्याच आहेत, की आधीच्या हे अद्याप डॉक्टरांकडून कळलेलं नाही.