पुणे : जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात शहीद झालेल्या मेजर शशीधरन व्ही. नायर यांच्यावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत करण्यात आले आहेत. आज सकाळी त्यांचं पार्थिव खडकवासला येथील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. वैकुंठ स्मशानभूमीकडे निघालेल्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थिती दाखवली.  लष्करी इतमामात शहीद मेजर नायर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये एका मेजरसह दोन जवान शहीद झालेत. तसेस आणखी दोन जवान जखमी झालेत. सीमेवर शुक्रवारी सायंकाळी एक मोठा आयईडी स्फोट घडवून आणण्यात आला. यांत मेजर नायर यांना हौतात्म्य प्राप्त झालंशनिवारी संध्याकाळी शहीद मेजर शशीधरन व्ही नायर यांचं पार्थिव पुण्याच्या दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल इथे आणण्यात आले होते. यावेळी लष्करी मानवंदना देण्यात आली.


शहीद मेजर त्यांच्यामागे पत्नी आणि आई असा परिवार आहे. त्यांच्या वडीलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. शहीद मेजर नायर यांना श्रद्धांजली देण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळत आहे. मेजर नायर जिंदाबाद, पाकीस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत.