पुणे : डिसेंबर पर्यंत लस मिळेल अशी माहिती आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी माहिती दिलीय. चार महिने आपल्याला असेच काढावे लागतील. लस काही एकाच वेळेला सर्वांना मिळेल असेही नाही. त्यामुळे मास्क आणि हात धुणे ही सध्याची लस असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईनंतर आता पुण्यातही आता जम्बो कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. पुण्यातील पहिले जम्बो हॉस्पिटलचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. तर पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झाले. गेल्या काही दिवसांपासून जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या उद्घाटनावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहरातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थित होते.


सामाजिक जनजागृती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. गाफील राहून चालणार नाही, गलथानपणा नको आहे. या कोव्हीड सेंटरचा उपयोग होऊ नये ही अपेक्षा आणि शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. पुणेकरणांनी चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल उभारलं त्याचा मला मोठा अभिमान आहे. 
पुणेकरांनी आणि मुंबईकरांनी केलं असं देशात कोणी असं केलं नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  



महत्वाचे मुद्दे 


पुण्यात बैठक झाली तेव्हा लवकर रुग्णालय उभं करावं हा माझा हट्ट होता. पावसाचं विघ्न असतांना तुम्ही हे सगळं उभं केलं. 
गणरायाच्या निमित्ताने कोरोनाच विघ्न जाईल 
- पुण्यातील गणेशोत्सव मोठा असतो, परदेशातील लोक येतात 
- सुनी सुनी पंढरी बघितली त्याच मला दुःख झालं होतं 
- सर्व धर्मियांना मी धन्यवाद देतो 
- मुस्लिम आणि जैन बांधवांनी जे सहकार्य केलं त्यांचे धन्यवाद 
- पुणे पोलिसांना खास धन्यवाद
- गणेशोत्सव साजरा करत असतांना घालमेल सुरू होती 
- मात्र त्याकाळात पोलिसांनी कलाकारांना घेऊन खास चित्रफीत केली
- त्यातून एक मार्ग दाखवला
- जगभरातील एक अनुभव 
- एक लाट ओसरली की दुसरी लाट येते
- व्हेंटिलेटर बेड पेक्षा ऑक्सिजन बेड महत्त्वाचे
- फक्त तंबू नाही ठोकला दर्जेदार हॉस्पिटल उभारलं