नाशिकमध्ये महात्मा फुले योजनेत मोठा भ्रष्टाचार; महाराष्ट्रात पहिल्यांदाच 2 डॉक्टरांना अटक
महात्मा फुले योजनेत अधिक पैसे मागणाऱ्या दोन डॉक्टरांना नाशिकमध्ये लाच लुचपत खात्याने अटक केली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Nashik Crime News : महात्मा फुले योजने अंतर्गंत रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये शासकीय मोफत योजनेमध्ये उपचार घेत असताना अनेकदा डॉक्टरांकडून अधिक पैसे मागितले जातात. रुग्णांचे नातेवाईक ते देऊनही टाकतात. मात्र, डॉक्टरांकडून असे पैसे मागणे बेकायदेशीर आहे. त्यांना कारावास ही होऊ शकतो. नाशिक जिल्ह्यातील पिंपळ गावात असेच उपचारासाठी अधिक पैसे मागणाऱ्या दोन डॉक्टरांना लाच लुचपत खात्याने पैसे घेताना रंगेहात अटक अटक केली आहे. या डॉक्टरांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
शासकीय अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. पहिल्यांदाच दोन खाजगी डॉक्टरांना लाच गेताना अटक करण्यात आलेय. पिंपळगावतील धन्वंतरी हॉस्पिटलचे हे संचालक आहेत. या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात. या योजनेअंतर्गत 15 फेब्रुवारीला एका महिलेच्या हात फ्रॅक्चर असल्याने ऑपरेशन करण्यात आले. यासाठी आवश्यक असलेले आधार कार्ड इतर पुरावे झेरॉक्स देण्यात आले. मात्र, तरीही ऑपरेशन साठी आधी आठ हजार रुपये आणि नंतर पुन्हा सात हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या मागणीला वैतागून तक्रारदाराने नाशिकच्या लाच लुचपत विभागात तक्रार दिली. शासकीय योजनेत भ्रष्टाचार होत असल्याने विभागाने तातडीने पैसे घेणाऱ्या दोघा डॉक्टरांना ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
महात्मा फुले योजना आणि आयुष्यमान योजना असे दोन्ही योजने मिळून सध्या पाच लाख रुपयांचे मोफत उपचार नागरिकांना दिली जातात. हॉस्पिटलला सरकारी दराची पूर्णपणे कल्पना देऊन त्यांना या योजनेवर अधिकृत केले जाते. मात्र, तरीही वेगवेगळी करणं सांगून अनेक हॉस्पिटल त्यांच्याकडून अधिक पैसे उकळतात. उपचार केल्यानंतर एकही रुपया मागणे अयोग्य असल्याचे नाशिक जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केला आहे अशी कुणीही मागणी केल्यास थेट तक्रार करण्यात यावी असा आवाहन त्यांनी केला आहे. त्यामुळे तुम्हीही सावध व्हा असे पैसे मागणाऱ्या डॉक्टरांवर थेट आरोग्य योजनेतील हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करा अन्यथा लाच लुचपत विभागाला माहिती द्या. जेणेकरून शासकीय योजनेतून पैसे लाटणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई करणे सोपे होईल.