MMRDA Plans New 20-km Highway Connecting MMR :  बदलापुर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरातून दररोज लाखो प्रवासी कामानित्ताने मुंबईत येतात.रस्ते मार्गे मुंबईत येण्यासाठी थेट कोणताही रस्ता नाही. यामुळे या शहरातून जलद गतीने मुंबईत येण्यासाठी लोकल ट्रेन हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, दिवसेंदिवस या शहराची लोकसंख्या वाढत असल्याने मध्य रेल्वेवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. येथील प्रवाशांंची प्रवासाची अडचण दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने जबरदस्त प्लान बनवला आहे. बदलापुर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर या शहरांना डायरेक्ट मुंबई, नवी मुंबईशी जोडणारा महामार्ग बांधला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर या उपनगरांमध्ये झपाट्याने नागरी वसाहती निर्माण होत आहेत. त्यामुळे या शहरातीन नागरिंकाना मोठ्या वाहतूक कोंडीची सामना करावा लागतो. हा नवा महामार्ग येथील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.  एमएमआरडीएने मर्यादित प्रवेश महामार्गाच्या बांधकामासाठी नुकतीच निविदा काढली. या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे.


बदलापूरपासून मुंबई-दिल्ली दरम्यान हा महामार्ग सुरू होणार आहे. यामध्ये मुंबई-वडोदरा मार्ग, काटई-बदलापूर आणि कल्याण रिंगरोडचा समावेश आहे. या महामार्गाचा पहिला इंटरचेंज अंबरनाथमधील पालेगावात असणार आहे. तर, दुसरा इंटरचेंज कल्याण पूर्वेतील हेदुटणेमध्ये असेल. यासह बदलापूर इंटरचेंज आणि कल्याण रिंगरोड इंटरचेंज असे एकूण चार इंटरचेंज असतील.


हा मार्ग कल्याण रिंग रोड आणि कल्याण शिळफाटा रोडला जोडला जाणार आहे. या महामार्गाची लांबी 20 किलोमीटर असेल. यामध्ये तीन बोगदे आणि पाच अंडरपास असतील. हा महामार्ग 8 लेनचा असेल. यात कॅरेजवे आणि सर्व्हिस लेन देखील असणार आहेत. या महामार्गावर ताशी 80 किलोमीटर वेगाने वाहने धावू शकणार आहेत.


महत्त्वाची बाब म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजेच NAINA यांना देखील या महामार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्यामुळे या महामार्गावरुन थेट नवी मुंबईला देखील जाता येणार आहे. या महामार्गामुळे ठाणे आणि परिसरातील महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. या महामार्गासाठी 200 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. हा प्रकल्प 10.833 कोटींचा आहे. या प्रकल्पाच्या सविस्तर अहवालासाठी 31 जानेवारीला एक बैठक होणार आहे.  17 फेब्रुवारीला ऑनलाइन निविदा अर्ज मागवले जाणार आहेत.