देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : 11 जूनपासून नेरळ-माथेरान आणि 9 ऑगस्टपासून अमन लॉज-माथेरान शटल सेवा मध्य रेल्वेने सुरक्षेचे कारण पुढे करत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय माथेरानच्या पर्यटनाला मारक ठरत असून येथील स्थानिक भूमिपुत्र पर्यटन कमी झाल्यामुळे त्रस्त आहेत. यामुळेच माथेरान मधील सर्व पक्षीय नेत्यांनी नेरळ येथे 'रेल रोको'च्या आंदोलनाचा निर्णय घेतला. हे आंदोलन करू नये म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांनी दोनवेळा माथेरानला भेटी दिल्या. पण प्रत्येक अधिकाऱ्यांनी वेगवेगळी कारणे माथेरान करांसमोर सांगून आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आडमुठी धोरणामुळे नाराज झालेल्या माथेरान करांनी 14 ऑक्टोबर ला मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर रेल रोको आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे  20 ऑक्टोबर पर्यंत अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू झाली नाही तर 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा सर्व पक्षांनी निर्णय घेतला आहे.



14 ऑक्टोबर रोजी पूर्ण माथेरान बंद करून सर्व माथेरान कर रेल रोको करणार आहेत. पावसामुळे नेरळ माथेरान दरम्यान काही भागात दरडी कोसळल्या आहेत तर रुळाखालील जमीन वाहून गेली आहे त्यामुळे सुरक्षेचे कारण पुढे करत मिनिट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


अधिकारी येथे येऊन फक्त पाहणी करून जातात प्रत्यक्षात कृतीशून्य कारभार त्यामुळे त्रस्त झालेल्या माथेरान करांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.