मुंबई : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या रस्ता कामात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील मौजे पेढे परशुराम ग्रामस्थांच्या काही जमिनी जात आहे. त्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी होत आहे. याबाबत जमीन मोबदल्याप्रकरणी मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित बैठक झाली. यावेळी योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमीन मोबदल्याविषय संदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय येथे आढावा बैठक झाली. या बैठकीला रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार  विनायक राऊत, चिपळूण विधानसभा मतदार संघाचे सदस्य सदानंद चव्हाण, जिल्हा प्रमुख  बाळा कदम, जिल्हाधिकारी  सुनील चव्हाण, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी तसेच चिपळूण आणि राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंता देशपांडे आणि देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.