मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस मेगाब्लॉक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या वेगात सुरू आहे. दरम्यान, पुलावर गर्डर टाकण्यासाठी तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या वेगात सुरू आहे. दरम्यान, पुलावर गर्डर टाकण्यासाठी तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
यामध्ये खारपाडा इथे रेल्वे लाईनच्या नवीन पुलावर गर्डर टाकण्याच्या कामामुळे महामार्गावर मंगळवारपासून तीन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.
गर्डर टाकण्याचं काम दुपारी २ ते ४ या वेळेत होणार आहे. त्यासाठी वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे.
या कालावधीत जुन्या खारपाडा पुलावरून प्रत्येकी १० मिनिटांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येईल.
शिवाय या कालावधीत रेल्वे वाहतूकही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.