Pune Crime News :  पुण्यात म्याव म्याव ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिवसेंदिवस पुणे शहराला ड्रग्सचा विळखा पडत असल्याचे दिसत आहे.  पुण्यातील मध्यवर्ती भागात पोलिसांनी कारवाई करत हा ड्रग्ड साठा हस्तगत केला आहे.  10 लाख रुपये किमतीचे हे एमडी (मेफीद्रोण) ड्रग्स आहेत. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या प्ररकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुजाहिद अनवर शेख ( वय 25 वर्षे) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील भवानी पेठेत पोलिस गस्तीवर असताना त्यांना मुजाहिद अनवर शेख हा इसम काहीतरी अमली पदार्थ विक्री करिता समर्थ पोलीस स्टेशन हद्दीमधील रोशन मस्जिद जवळ येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या संदर्भात कारवाई करताना संशयावरून त्याला ताब्यात घेतले आहे. 


पोलिसांनी तात्काळ अनवर याला ताब्यात घेतेल. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ  10,40,400 रुपये किमतीचे 52 ग्रॅम एम डी हे अमली पदार्थ तसेच 10,000 रुपयांचा एक मोबाईल असा एकूण 10,50,00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुजाहिद याला अटक केली असून पोलिसांनी त्याच्याकडून पुढील तपास सुरू केला आहे. मुजाहिद याने ड्रग्ज कुठून मिळवले. तो हे ड्रग्ज कुठे सप्लाय करणार होता. याचा पोलिस तपास करत आहेत. 


पुण्यातून कॅथा इडूलिस काट ड्रग्ज जप्त


भारतात उपलब्ध नसलेल्या कॅथा इडूलिस काट या ड्रग्ज जप्तीची राज्यातली पहिली कारवाई, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केली होती. पुण्यातल्या शाळा-कॉलेजांतले विद्यार्थी या ड्रग्जच्या आहारी जात आहेत. आफ्रिकेतल्या या ड्रगची दीड लाख रूपयांची पावडर पोलिसांनी जप्त केली होती. 


पुण्यात 5 कोटींचा ड्रग्जसाठा जप्त  


पुण्यात 5 कोटींचा ड्रग्जसाठा जप्त  करण्यात आला होता. 4 जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल एक किलोचे पाच कोटींचे ड्रग्ज जप्त केले. मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई करून या सर्व प्रकरणी चार जणांना अटक केली. 29 मे रोजी एका वाहनामधून पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर 850 ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले. याप्रकरणी सखोल तपास करताना पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले होते.