Rain Update : हवामान विभागाकडून `या` जिल्ह्यांना हायअलर्ट
हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक भागातील नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. पुणे, मुंबईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
3 दिवस महत्त्वाचे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, नाशिक, कोकण, सातारा, मुंबई अशा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. गेल्या आठवड्यात पुणे, कोल्हापूर आणि सांगलीत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तसेच काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाले यांना देखील पूर आला होता.
धरणांच्या साठ्यांमध्ये वाढ
मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. काही जिल्ह्यांमधील धरणे भरली आहेत. अनेक ठिकाणी पावसामुळे पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. नद्या, नाले भरून वाहू लागले आहेत.