गोलमाल है भाई सब गोलमाल है! एजन्सीच्या `अशा` हेराफेरीने महावितरणला गंडा
वीज ग्राहकांच्या मीटर रिडींगचे कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या एजन्सीनं ग्राहकाकडून पैसे घेऊन मीटरमध्ये छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे.
जयेश जगड , झी २४ तास, अकोला : उन्हाळ्यात वीज वापर मोठ्या प्रमाणात होतो. (Use of electricity in Summers) त्यामुळे ग्राहकांना विजबिलही जास्त येतात. जादा बिळापासून सुटका मिळावी म्हणून काही ग्राहक थेट विजेच्या तारांवर आकडे टाकतात, तर काही थेट आपल्या वीज मीटर्समध्ये सेटिंग (Electricity meter setting) करतात. अशाच वीज मीटरमध्ये सेटिंग करणाऱ्या रॅकेटचा आता पर्दाफाश महावितरणच्या (Mahavitaran Akot Office ) अकोट विभागीय कार्यालयाने केला आहे.
ग्राहकांच्या विद्युत मीटरमध्ये छेडछाड झाल्याची तक्रार महावितरणच्या अकोट विभागाचे उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल (Gopal Agarwal ) यांनी अकोट पॉइलिसांमध्ये दिली. पोलिसांनी याप्रकरणी शरद गिरी, किशोर सावरकर आणि गोवर्धन वानखेडे या तिघांविरोधात भादंविच्या कलम ४०६, ४२० आणि भारतीय विद्युत कायदा कलम १३८ आणि १३९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कुंपणच खात होतं शेत...
अकोट उपविभागातील वीज मीटर वाचनाच्या नोंदीचे काँट्रॅक्ट्स अकोल्याच्या मेसर्स लेखा एंटरप्रायजेस या एजन्सीला देण्यात आले आहेत. विज ग्राहकांनी वापरलेल्या विजेची नोंद घेण्यासाठी मीटरचे फोटो घेणे ही जावबदारी या संस्थेला दिली होती. मात्र मीटर रिडींग करणाऱ्या टोळीनेच वीज चोरीत सहभाग घेतला.
सर्व प्रकार आला उघडकीस...
अकोटचे उपकार्यकारी अभियंता आणि दहिहांडा शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांना मिळालेल्या माहितीनुसार एका मीटरमध्ये छेडछाड करण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी विजेच्या मीटर्सची तपासणी केली तेंव्हा हा सर्वप्रकार उघडकीस आला.
जाणून घ्या मोटार सेटिंगची कशी केली सेटिंग
अधिकाऱ्यांच्या तपासणी दरम्यान धक्कादायक बाबी समोर आली. यावेळी मीटरला मागून छिद्र केल्याचे आढळून आले. वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याने मीटर वाचन करतेवेळी नोंदी अस्पष्ट दिसत होत्या. अशा प्रकारे मीटरमध्ये सेटिंग केली जात होती. या कामासाठी ही टोळी किती पैसे घ्यायची, हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. यासाठी फक्त १०० रुपये प्रति महिना पैसे घेतले जायचे.
वीज चोरी हा गुन्हा
महावितरणच्या विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करणे आणि वीज चोरी करणे हा दंडनीय अपराध आहे. यामध्ये गुन्हा सिध्द झाल्यास आरोपींना कठोर शिक्षेची तरतूद वीज कायद्यात आहे. अशा प्रकरणात राज्यात अनेक ठिकाणी विजचोरांना शिक्षा झाली आहे. आता अकोट विभागातील या टोळीने आणखी किती मीटरमध्ये सेटिंग केली आहे, याची माहिती घेतली जात आहे.
meter reading agency took money for settings in mahavitaran meters just for 100 rupees