पुण्यात रिंग रोडपाठोपाठ मेट्रोच्या कामाला वेग
पुण्यात रिंग रोडपाठोपाठ पीएमआरडीएच्या मेट्रोने देखील वेग घेतला आहे.
पुणे : पुण्यात रिंग रोडपाठोपाठ पीएमआरडीएच्या मेट्रोने देखील वेग घेतला आहे. मार्च २०१८ मध्ये पीएमआरडीए मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याचा विश्वास पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी व्यक्त केला आहे.
मेट्रो हिजंवडी ते शिवाजीनगर दरम्यान
पीएमआरडीएची मेट्रो हिजंवडी ते शिवाजीनगर दरम्यान धावणार आहे. हे अंतर तेवीस कीलोमीटर आहे. त्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. यातील चाळीस टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे.
आयटी हबसाठी मेट्रो वरदान
इतर निधी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधून उभारला जाणार आहे. पुण्याचं आयटी हब असलेल्या हिजंवडीसाठी पीएमआरडीएची मेट्रो वरदान ठरणार आहे.