मुंबई  : तुम्ही म्हाडाच्या घरात राहत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. म्हाडाच्या इमारतींना यापुढे मालकी हक्क मिळणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे नेमके काय परिणाम होणार, ते पाहूयात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हजारो जुन्या म्हाडा इमारतींचा पुनर्विकास रखडला असताना, आता गृहनिर्माण विभागाने नवा निर्णय घेतलाय. त्यानुसार म्हाडाच्या इमारतींना यापुढे मालकी हक्क दिला जाणार नाही. याचाच अर्थ तुम्ही म्हाडाच्या घरात राहत असला आणि ते घर तुमच्या मालकीचे असले तरी ती जमीन मात्र म्हाडाच्याच मालकीची असणार आहे.


एवढेच नव्हे तर यापुढे म्हाडा इमारतीचा पुनर्विकास करताना सोसायटी, बिल्डर आणि म्हाडा असा त्रिपक्षीय करारनामा करणे गृहनिर्माण विभागाने बंधनकारक केलं आहे.


ठळक मुद्दे


  • मुंबईत म्हाडाच्या 56 वसाहती आणि 104 अभिन्यास आहेत.

  • या सर्व इमारती 50 वर्षांहून अधिक काळ जुन्या आहेत.

  • मात्र म्हाडाचे अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडलेत.

  • रहिवाशांना भाडेही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

  • मालकी हक्क दिल्याने म्हाडाला पुनर्विकासात हस्तक्षेप करता येत नव्हता.

  • पण नव्या निर्णयानुसार पुनर्विकासासाठी म्हाडाची संमती बंधनकारक आहे.

  • त्यामुळं बिल्डरमार्फत होणारी फसवणूक कमी होईल.

  • तसंच पुनर्विकासानंतर म्हाडालाही घरांचा अतिरिक्त साठा मिळेल.


म्हाडाच्या सहभागामुळे खरंच म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाला गती मिळेल की, पुनर्विकास आणखी खोळंबेल, हे येणारा काळच ठरवेल.