मुंबई: कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीनंतर पहिल्याच दिवशी विजेत्यांना देकारपत्र देत म्हाडाने नवा इतिहास रचलाय. ९ हजार १८ घरासाठी शनिवारी सोडत काढण्यात आली. विजेत्यांची पात्रता तपासण्यासाठी होणारी सगळी दिरंगाई टाळत म्हाडाच्या वतीने लगेचच २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत पात्रता तपासणी विशेष शिबीर म्हाडा मुख्यालयात सुरु करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळातील घरांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सोडत निघणारअसल्याची घोषणाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शनिवारी केली. 900 ते 1000 घरांसाठी ही सोडत निघणार आहे.


म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या 9,018  घरांच्या लॉटरीची सोडत शनिवारी जाहीर करण्यात आली. यावेळी म्हाडाच्या कोकण विभागाच्या घरांसाठी खरेदीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याविषयी मी स्वतः माहिती घेणार असल्याचे प्रकाश मेहतांनी सांगितले.