पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना `म्हाडा`ची खुशखबर
पाषाण, बावधन, वाकड, पिंपळे सौदागर, धानोरी, चिखली, मोशी भागांत घरं उपलब्ध
पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी... म्हाडाची घरं विकत घेऊं इच्छिणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील जनतेला 'म्हाडा'तर्फे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील ८१२ नवीन घरांसाठीची सोडत जाहीर झालीय. पाषाण, बावधन, वाकड, पिंपळे सौदागर, धानोरी, चिखली, मोशी अशा विविध भागांतील एकूण २७ गृहप्रकल्पांमध्ये ही घरं उपलब्ध आहेत. या घरांचे क्षेत्रफळ ३५० ते ६५० चौरस फूट इतकं आहे.
घरांची किंमत सरासरी ११ लाखांपासून २० लाखांपर्यंत आहे. समाजातील अनुसूचित जाती जमाती, दिव्यांग, माजी सैनिक अशा विविध प्रवर्गांसाठी काही घरं आरक्षित आहेत. यावेळी सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://lottery.mhada.gov.in या संकेत स्थळावर येत्या ५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सोडतीची प्रस्तावित तारीख १९ डिसेंबर २०१८ ही आहे.