MHADA News : आपले स्वत:चे घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यात मुंबईत आपले घर असेल असे प्रत्येकाला वाटत असते. जर तुम्हाला स्वत:चे घर घ्यायचे असेल तर म्हाडा आणि सिडकोची घरे उपलब्ध आहेत. त्यासाठी सरकारकडून लॉटरी काढण्यात येते. आता म्हाडाचे घर मिळण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. (Mhada Lottery 2023) म्हाडाने कागदपत्रांची संख्या 21 वरुन केवळ सहा ते सात करण्यात आली आहे. (MHADA Documents) ही प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. त्यामुळे जास्तीचे कागदपत्र आणि त्रासदायक प्रक्रियेतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घर हवे असलेल्या मुंबईकरांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने अर्थात म्हाडाने 5 जानेवारी ही गृहनिर्माण लॉटरी योजनेची तारीख जाहीर केली आहे. अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, म्हाडाच्या मुंबई विंगमध्ये एकदाच नोंदणी केली जाईल. ज्याच्या मदतीने, अर्जदारांना म्हाडाच्या इतर विभागांच्या ऑनलाइन लॉटरी योजनेत प्रवेश मिळेल.ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेदरम्यान अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे अपेक्षित आहे, ज्यामुळे ते गृहनिर्माण लॉटरी योजनेसाठी पात्र ठरतील.


म्हाडा कागदपत्रे प्रक्रिया अधिक सुलभ  


म्हाडाच्या घर सोडत प्रक्रियेत सोडतीनंतर अर्जदाराची पात्रता निश्चित करण्यात आली. अर्ज भरताना 21 कागदपत्रे जोडणे आवश्यक होते. मात्र, आता म्हाडाने ही प्रक्रिया एका अॅपद्वारे आणि कमी कागदोपत्री राबविण्याचा निर्णय घेतला आहे. (One app, less paperwork; MHADA simplifies process)


म्हाडाच्या नव्या प्रणालीनुसार अर्जदाराची पात्रता आता सोडतीपूर्वी ऑनलाइन केली जाणार आहे. त्यासाठी फक्त सहा ते सात कागदपत्रे लागणार आहेत. अर्जदाराने जोडलेली कागदपत्रे डीजी लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली जातील. घरे मिळण्याबाबतची माहिती अर्जदाराला एसएमएस आणि ईमेलद्वारे दिली जाईल.


Mhada घर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे


1. ओळख पुरावा ( Identity Proof) : आधार कार्ड (मोबाइल नंबर आधारशी लिंक करणे आवश्यक आहे), पॅन कार्ड


2. प्रतिज्ञा पत्र (Self Declaration)


3.सध्याच्या वास्तव्याचा पुरावा : अर्जदाराच्या आधार कार्डावरील पत्ता सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास, अर्जदाराने सध्याचा पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. (Proof of Current Residence)


4.महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र: तहसीलदाराने दिलेले प्रमाणपत्र (Maharashtra State Domicile Certificate)


5.स्वतःच्या उत्पन्नाचा पुरावा : तहसीलदाराने जारी केलेले आयकर विवरण किंवा उत्पन्नाचा पुरावा. (Income tax return or income proof issued by Tehsildar) किंवा जोडीदाराचा उत्पन्नाचा पुरावा: नोकरीत असल्यास जोडीदाराचे आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदाराने जारी केलेले उत्पन्नाचा पुरावा (Income Proof of Spouse) आणि स्वघोषणा पत्र  (self declaration letter) 


6. जात प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र तसेच इतर श्रेणीनिहाय प्रमाणपत्र (Caste certificate or caste verification certificate)