Mhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या
MHADA LOTTERY 2023 Registration: पुण्यात म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी. कमी उत्पन्न गटासह मध्यम गटातील लोकांना आता स्वस्त घर घेता येणारा आहे. एकून 5,990 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करु शकता.
Pune MHADA Lottery 2023 Registration Eligibility How to Apply: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MHADA) पुणे विभागात 5,990 परवडणारी घरे उपलब्ध केली आहे. याची जाहिरातही निघाली आहे. दरम्यान, 5,990 घरांपैकी 2,908 घरे 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर विकली जाणार आहेत. तर उर्वरित घरे म्हाडा पुणे मंडळाने (Pune Mhada) आयोजित केलेल्या लॉटरी अंतर्गत विकली जातील. लॉटरीचा निकाल 17 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.
म्हाडाची घरे (MHADA Homes) घेणाऱ्याचे उत्पन्न विचारात घेऊन घरांचा आकार आणि किंमत यावर आधारित अनेक श्रेणींमध्ये तब्बल 5,990 घरे विक्रीसाठी आहेत. उत्पन्न गट आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) आदी गटांत विभागला गेला आहे.
Mhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर
प्रत्येक फ्लॅटचा आकार 300 चौरस फूट ते 600 चौरस फुटांपेक्षा जास्त आहे. क्षेत्रफळानुसार त्याची किंमत 13 लाख ते 60 लाख रुपयांच्या घरात आहे. सर्व घरे ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दरम्यान आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही पहिलीच लॉटरी असेल जी पूर्णपणे ऑनलाइन काढली जाईल. प्राधिकरणाने गेल्या आठवड्यात एक मोबाइल अॅप्लिकेशन लॉन्च केले ज्याद्वारे लोक नोंदणी करु शकतात आणि लॉटरी प्रणाली अंतर्गत घर खरेदी करण्यासाठी अर्ज करु शकतात.
एकदा ऑनलाइन नोंदणी झाली की, अर्जदाराला त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात. पडताळणीनंतरच अर्जदार लॉटरीत सहभागी होण्यास पात्र ठरेल.
आधी येणाऱ्याला प्रथम प्राधान्य!
म्हाडाच्या 5,990 घरांपैकी 2,908 घरे ही लॉटरीशिवाय विकली जाणार आहे. किंवा तसेच पूर्वीच्या लॉटरीत खरेदीदार न मिळालेल्या या 2,908 सदनिकांची यावेळी आधी येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर विक्री केली जाणार आहेत. म्हाडाच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, या सदनिका आधीच्या लॉटरीत विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यांची विक्री केली जात आहे.
म्हाडा घर लॉटरीसाठी अर्ज कसा करावा?
म्हाडा लॉटरी 2023 च्या अर्जदारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट www.mhada.gov.in/en वर नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यानंतर अर्जदारांना 'लॉटरी आणि योजना निवडा' लागेल.
नेट बँकिंगद्वारे लॉटरी नोंदणीसाठी शुल्क भरणे ही शेवटची पायरी आहे.
अर्जदारांना त्यांच्या उत्पन्नाच्या श्रेणीनुसार लॉटरी नोंदणी शुल्क ऑनलाइन भरावे लागते. मुंबई, पुणे आणि नागपूर महानगर भागात राहणाऱ्यांसाठी EWS श्रेणीसाठी उत्पन्नाचा स्लॅब रुपये 6 लाख आणि उर्वरित राज्यासाठी 4.5 लाख रुपये आहे.
एलआयजी श्रेणीसाठी उत्पन्नाचा स्लॅब मुंबई, पुणे आणि नागपूर महानगर क्षेत्रासाठी 9 लाख रुपये आणि उर्वरित राज्यासाठी 7.5 लाख रुपये आहे. राज्यभरातील एमआयजी श्रेणीसाठी उत्पन्नाचा स्लॅब वार्षिक 12 लाख रुपये आहे. आणि HIG श्रेणीसाठी ते वार्षिक 12 लाखांपेक्षा जास्त आहे.