Love Affair News: प्रेम हे आंधळे असते, प्रेमात पडल्यावर जात-पात, वय-धर्म याचे काहीच महत्त्व उरत नाही, अशा गोष्टी तर तुम्ही ऐकल्या असतीलच. महाराष्ट्रातही एक अजब प्रकरण समोर आले आहे. दोन मुलांची आई असलेली 50 वर्षीय महिला एका 25 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. महिला प्रेमात इतकी वेडी झाली की तिने त्याच्यासोबत राहण्यासाठी घर-दारदेखील सोडले आहे. मात्र, प्रियकराकडे पोहोचताच त्याने जे केलं ते पाहून तिच्या पायाखालची जमिनच हादरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजब-गजब प्रेम प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पण तरुणाने आता मात्र भलताच दावा केला आहे. ती माझ्या आईच्या वयाची आहे. माझं तिच्यावर प्रेम नाहीये. तिनेच मला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आहे, असा आरोप तिने केला आहे. तर, महिला मात्र मागे हटायलाच तयार नाहीये. प्रेमाला वयाचे बंधन नसते, असा दावा तिने केला आहे. दोघांपैकी कोणीच माघार घेत नसल्याने पोलिसांसाठी हे प्रकरण डोकेदुखी ठरली आहे. 


महिलेचे नाव शिवा असं असून ती मुळची पुण्याची आहे. पुण्यात असताना ती तौकीर नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली. दोघांमध्येही प्रेमसंबंध निर्माण झाले. नंतर, त्याला भेटण्यासाठी ती बिहारच्या सीतामढीत गेल्या पाच दिवसांपासून तळ ठोकून बसली आहे. मात्र तो तिला भेटण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळं तिने पोलिसांकडे मदत मागितली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या प्रियकराचा शोध घेत तिच्यासमोर हजर केले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणताच निष्कर्ष निघालेला नाही. 


तौकीर बिहारच्या सीतामढी येथे राहतो. त्याचे वय 25 वर्षे आहे. शिवाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका खासगी नर्सिंग होममध्ये ती नर्स म्हणून कार्यरत आहे. जेव्हा तिची तौकीरसोबत ओळख झाली तेव्हा तो पूर्णपणे नशेत बुडालेला होता. तिनेच त्याचे आयुष्य सावरले आणि त्याला योग्य मार्गावर आणले. तिला दोन मुलंदेखील आहेत. तसंच, एक वर्ष ते पती-पत्नी म्हणून राहत होते. महिलेच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला नकार होता. मात्र, नकाराला न जुमानता तिला तौकीरसोबतच राहायचं आहे. तिला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. 


दरम्यान, महिलेने केलेल्या दाव्यावर तौकीरने मात्र उलटच उत्तर दिलं आहे. सदर महिला ही माझ्या आईच्या वयाची आहे. तिने मला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आहे, असा आरोप तौकीरने केला आहे. त्यामुळं या नात्याचा गुंता सोडवणे पोलिसांसाठीदेखील आव्हान ठरले आहे.