Milk Price Hike : दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सर्वसाम्यांना आणखी एक झटका बसणार आहे. दरम्यान येत्या काळात दुधाचे दर (Milk Price ) आणखी पाच ते सहा रुपयांनी वाढण्याची भीती इंडियन डेअरी असोसिएशनचे (Indian Dairy Association) संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केली आहे. अनेक कारणांमुळे दुधाचे उत्पादन घटणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूधाच्या एकूण उत्पादनात 7 ते 10 % घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दूध खरेदीसाठी दूध संघांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन सर्वसामान्यांना दूध महागणार (milk price hike) आहे. अति आणि अनियमित पावसामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे वैरणीची कमतरता भासत आहे.


गव्हाचं उत्पादन घटल्याने तसंच इंधन, वाहतूक आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे यामुळे पशुखाद्याच्या दरात (cost of animal feed) वाढ झाली आहे. त्यामुळे पशूपालकांनी पशूखाद्य (animal husbandry) घेणं कमी केलंय. याचा परिणामही दूध उत्पादनावर होतोय. त्यातच लम्पी (Lumpy) रोगामुळे अनेक दुधाळ जनावरे मृत्यू मुखी पडली आहेत. परिणाम दूध उत्पादनावर झाल्याचे दिसून आले आहे.


यावर्षी दुधाचा फ्लश सिझन आलाच नसल्याने दरवर्षी अतिरिक्त दुधातून लीन सिझन (Lean season from milk) साठी वापरण्यात येणाऱ्या दूध पावडरची निर्मिती थांबली आहे. याचा परिणाम पुढील वर्षापर्यंतच्या दूध पुरवठ्यावर होणार आहे. अशी परिस्थिती जवळपास ऑक्टोबर 2023 पर्यंत कायम राहणार आहे. ज्या खासगी आणि सहकारी दूध संघाकडे दूध पावडर आणि बटर चा पुरेसा साठा आहे, असेच दूध संघ या काळात तग धरू शकतील


तसेच दुधाची कमतरता हि दुधामधील भेसळ आणि नित्कृष्ट दर्जाच्या दुधासाठी कारणीभूत ठरू शकेल. स्पर्धा वाढल्याने दुधाचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करणारे आणि त्यला प्राधान्य देणारे दूध संघ बऱ्यापैकी दर देऊन स्पर्धा निर्माण करू शकतात. तर निव्वळ दूध विक्री ला प्राधान्य देणाऱ्या संघांना दूध खरेदीच्या स्पर्धेत स्वतःचे अस्तित्व टिकवणे कठीण होणार आहे. अशा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी दूध संघांनी त्याच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात किमान 5 रुपयांची दरवाढ करणे क्रमप्राप्त आहे.


दूध उत्पादन घटण्याची नेमकी कारण


वैरणीची कमतरता : अति आणि अनियमित पावसामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. याचे प्रमाण जवळपास 26 % इतके आहे. याशिवाय कोरड्या वैरणीची उपलब्धता 25 % नि कमी झाली आहे. सध्यस्थितीत सुयोग्य वैरण व्यवस्थापनासाठी देशातील एकूण उत्पादनक्षम जमिनी पैकी 8.5 % जमीन ही गवताळ असायला हवी जी सध्यस्थितीत प्रत्यक्षात 4.5 % इतकीच आहे. 2033 साठीच्या 330 मिलीअन मेट्रिक टन दूधाच्या उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक 14  ते 16 % इतकी गवताळ जमीन आपल्याकडे उपलब्ध नाही.


पशुखाद्याच्या दरातील वाढ : गव्हाचे उत्पादन घटले असल्याने तसेच इंधन, वाहतूक आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमती यामुळे पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून दूध उत्पादकांनी दुधाळ जनावरांना देण्यात येणाऱ्या पशुखाद्यात कपात केली आहे


दुधाळ जनावरात झालेला लम्पी रोगाचा प्रादुर्भाव: जनावरांच्या मुक्त चरण्यावर बंधन आल्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे.  लसीकरणामुळे झालेल्या आरोग्यातील बदलामुळे देखील दूध उत्पादन घटले आहे. जनावरांचे बाजार बंद झाल्याने जनावरांचे प्रेरण थांबले आहे


मागणी आणि पुरवठ्यामध्ये आलेली मोठी तफावत : याचा परिणाम भारताकडून दुधाच्या दरवर्षी होणाऱ्या 1.18 लाख मेट्रिक टन निर्यातीवर होणार आहे. त्यामुळे मिळणाऱ्या परकीय चलनावर याचा परिणाम होणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोप अशा जगातील प्रमुख दूध उत्पादक आणि निर्यातदार देशात देखील दुष्काळामुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे दुधाच्या जागतिक बाजारपेठेला देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे.