सोलापूर : सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (AIMIM Chief Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेसाठी मुसलमानांना धोका
2019च्या  निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एमआयएमला (MIM) मतदान करू नका म्हणून प्रचार केला आम्हला मत दिलं तर शिवसेना भाजपाला मतदान होईल असा प्रचार या दोन पक्षांकडून केला गेला. काँग्रेसन आणि राष्ट्रवादीने आम्हला भाजपची (BJP) 'बी' टीम म्हटलं आणि जेव्हा सत्ता स्थापना करावी लागली तेव्हा हेच लोक एकत्र आले आणि आपण सगळे एक आहोत असा सांगत मुसलामानांना धोका दिला असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. 


शिवसेना सेक्युलर पार्टी नाही
याचबरोबर असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना सेक्युलर पार्टी नाही तर ती जातीयवादी पार्टी होती, आहे आणि राहील, त्यामुळे त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही असं सांगत ओवेसी यानी शरद पवार आणि राहुल गांधी तुम्ही सांगा शिवसेना सेक्युलर आहे? असा सवाल उपस्थित केला.


48 तासांचा नवरा
अजित पवार राष्ट्रवादीला वाचवण्यासाठी 48 तासांचा नवरा बनले होते, फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळीच सकाळी लग्न केलं, सगळ्या फाईल गायब केल्या आणि पुन्हा शिवसेनेकडे आले. आता पवारसाहेबांनी सांगावं या लग्नात नवरी कोण होती अशी टीकाही शरद पवार यांनी केली.


घोटाळे लपवण्यासाठी सत्ता 
उद्धव ठाकरे सभागृहात म्हणतात की बाबरी मस्जिद आम्ही पडली तेव्हा सेक्युलर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटली नाही? आपला परिवार वाचवण्यासाठी, घोटाळे लपवण्यासाठी, यांनी शिवसेनेसोबत एकत्र सत्ता स्थापन केली आणि सेक्युलरीजमला जमिनीत पुरून टाकलं अशी जोरदार टीका ओवेसी यांनी केली आहे.


मुसलमानांना शिक्षणाचा अधिकार नाही का?
तुम्हाला कलम जिवंत ठेवेल तलवार नाही, त्यामुळे खिशात पेन ठेवत जा असा सल्ला यावेळी ओवेसींनी कार्यकर्त्यांना दिला. आम्ही शिक्षणात आरक्षण मागितलं तुम्ही दिल नाही, आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं तोंड का बंद आहे, महाराष्ट्रात 4 टक्केच मुसलमान पदवीधर आहेत, मुसलमानांचा ड्रॉप आऊट रेटचं प्रमाण देखील जास्त आहे,  आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही का? असा सवाल ओवेसी यांनी विचारला आहे.


समीर वानखेडे यांना टोला
महाराष्ट्रात किती मुस्लिम IAS आहेत? एक आहे तो म्हणतोय मी हिंदू आहे, असं म्हणत ओवेसी यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचं नाव न घेता टीका केली आहे. सेक्युलरच्या नावाखाली मुसलमानांच्या पाठीवर एवढे खंजर मारले गेले की आज आमच्या पाठीवर जागा शिल्लक नाही, अशी खंतही ओवेसी यांनी यावेळी व्यक्त केली.


83 टक्के मुसलमानांकडे महाराष्ट्रात शेती नाहीए, ज्या लोकांकडे जमिनी आहेत त्यांना आरक्षण देत आहेत मात्र ज्यांना जमीन नाही त्यांना आरक्षण नाही हे तुमचं सेक्युलरीजम, सेक्युलॅरीजमच्या नावाखाली मुसलमानांनो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची गुलामगिरी करत आहात अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.


डिसेंबरमध्ये मुंबईत धडकणार
11 डिसेंबरला मुंबईत अरक्षणासाठी तसंच वक्फच्या जमिनी वाचवण्यासाठी जाणार आहोत. पूर्वी कोरोनाचं कारण देत परवानगी नाकारली होती. मात्र आम्ही आता 11 डिसेंबरला मुंबईत जाणारच असा इशाराही ओवेसी यांनी दिला आहे.