औरंगाबाद : एमआयएमचा वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतिन आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला आला होता. मात्र महापौरांनी त्याला प्रवेश नाकारला. मतिन यानं वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध केला होता. त्यानंतर भाजपा  नगरसेवकांनी त्याला सभागृहातच चोपलं होतं. त्यानंतर त्याचं सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आलाय.  या घटनेनंतर सय्यद मतिन अनेक दिवस जेलमध्ये सुद्धा होता. मात्र जेलमधून सुटल्यानंतर आज पुन्हा त्यानं सभागृहात येण्याचा प्रयत्न केला असता त्याला मज्जाव करण्यात आला. मतिन सभागृहाच्या या धोरणाविरोधात न्यायालयात जाणार आहे. 


काय झालं होतं ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद पालिका सभागृहात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास नगरसेवक सय्यद मतिनने विरोध केला होता. त्यानंतर भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला मारहाण करत पालिकेच्या बाहेर काढलं होत.


या मारहाणप्रकरणी भाजपच्या पाच नगरसेवकांना अटक करण्यात आलं होती. मारहाण झालेला एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन यानं याबाबत तक्रार केली होती.


सभागृहात अमानुष मारहाण झाल्याचं त्यानं तक्रारीत नमूद केलं होतं.


याच तक्रारीवरुन भाजप गटनेते प्रमोद राठोड, उपमहापौर विजय औताडे, नगरसेवक राजगौरव वानखेडे, माधुरी अदवंत आणि रामेश्वर भादवेंविरोधात गुन्हा दाखल झाला.