MIM In Mahavikas Aghadi : निवडणुकांच्या तोडांवर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकासआघाडीत जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. चर्चा आणि बैठकाचा जोर वाढला आहे. अशातच आता राज्याच्या राजकारणात आणखी एक प्रयोग पहायला मिळण्याची शक्यता आहे.  एमआयएमने महाविकास आघाडीकडे 28 जगांचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव मान्य करणार का? याबाबत शरद पवार यांनी खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MIMने महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र,  त्यासाठी MIMनंत काँग्रेस आणि शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 28 जागांचा प्रस्ताव पाठवला आहे. मुस्लिम बहुल 28 जागांची यादी या प्रस्तावासोबत देण्यात आली आहे. यात तडजोड करण्याची तयारी असल्याचेही  एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी म्हटल आहे. 


हे देखील वाचा...महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्रेड! दिलीप वळसे-पाटील, अभिमन्यू पवार, मिलिंद नार्वेकर यांच्या यादीत मुख्यमंत्र्यांच्या PA चे नाव?


महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुखपक्षांव्यतरिक्त  आधीचं भरपूर पक्ष आहेत ..त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये 288 जागांमध्ये नवीन पक्षाला जागा देणे कठीण असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले . एमआयएमच्या प्रस्तावाबाबत राऊतांनी हे स्पष्टीककरण दिले आहे.


हे देखील वाचा...राजकारणातला बुद्धीबळ ! शरद पवारांनी टिपले अजित पवारांचे मोहरे; बालेकिल्यातच टाकला मोठा डाव


राज्यात महाविकास आघाडीकडे एमआयएम पक्षाकडून जी मागणी करण्यात आली आहे त्याबाबत मला काही माहिती नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली आहे. तसेच  येण्याचे-घेण्याचे निर्णय जयंत पाटील बघतात. त्यामुळे या प्रक्रियेत आपण नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. 


हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ठरवतील - शरद पवार 


राष्ट्रवादीत हर्षवर्धन पाटलांचं स्वागत असल्याचं शरद पवार म्हणालेत...जयंत पाटील आणि त्यांची चर्चा झाली, आणि जयंत पाटलांनी आपल्याला कळवल्याचं शरद पवार म्हणालेत...हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ठरवतील असंही शरद पवार म्हणालेत..त्याचबरोबर अनेक लोकांची इच्छा आहे...कदाचित नंबर वाढलेले दिसतील असं म्हणत शरद पवारांनी आणखी पक्ष प्रवेशाचे संकेत दिलेत...


हे देखील वाचा... मुंबई ते पुणे 20 मिनिटांत, मुंबई ते गोवा एका तासात आणि मुंबई ते नागपूर फक्त दीड तासात... विमानापेक्षा सुपरफास्ट ट्रेन