भुजबळ लवकरच बाहेर येतील, दिलीप कांबळेंचं खळबळजनक वक्तव्य
‘छगन भुजबळ ही लढवैय्या व्यक्ती आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेसाठी संघर्ष करण्यासाठी ते तुरुंगातून बाहेर यायला हवेत’ असं खळबळजनक विधान आज राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलंय.
पुणे : ‘छगन भुजबळ ही लढवैय्या व्यक्ती आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेसाठी संघर्ष करण्यासाठी ते तुरुंगातून बाहेर यायला हवेत’ असं खळबळजनक विधान आज राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलंय.
ते पुण्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलत होते. दिलीप कांबळे यांच्या या वक्तव्याने वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
`ते लवकरच बाहेर येतील'
महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. ‘ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना जामीन मिळत नव्हता, ते कलम रद्द झालय. त्यामुळे आता ते लवकरच बाहेर येतील’, असा आशावादही कांबळेंनी व्यक्त केलाय.
`समता पुरस्कार आज डॉ मा गो माळी यांना'
दरम्यान महात्मा फुले समता परिषदेतर्फे दरवर्षी देण्यात येणार समता पुरस्कार आज डॉ मा गो माळी यांना देण्यात आला. यावेळी दिलीप कांबळे बोलत होते.
कलम ४५ हे घटनाबाह्य
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत तुरूंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. कारण या कायद्याचं कलम ४५ हे घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. तसंच कलम ४५ च्या शर्तींनुसार ज्या आरोपींना जामीन नाकारण्यात आला होता ते आदेशही सुप्रीम कोर्टानं रद्द ठरवलेत. त्यामुळं अशा आरोपींना जामीन मिळण्याची चिन्ह आहेत.