वाल्मिक जोशी, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. वसतीगृहात राहत असलेल्या पाच मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, वसतीगृहाच्या केअरटेकरनेच मुलींवर अत्याचार केल्याचं उघड झाले आहे. (Jalgaon Five Girl Raped By Caretaker)


जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडकी गावातल्या वसतीगृहातील पाच बालिकांवर अत्याचार प्रकरणी तिघांच्या विरोधात एरंडोल तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या कलम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 


एरंडोल तालुक्यातील खडकी या गावात मुलींचे शासकीय वसतीगृह असून येथे वास्तव्यास असणार्‍या पाच बालिकांवर अत्याचार करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींवर अनैसर्गिक अत्याचार देखील करण्यात आल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसतीगृहाचा केअरटेकर म्हणून काम करणार्‍या इसमानेच हे घृणास्पद कृत्य केले असून त्याला हॉस्टेलची अधिक्षका आणि सचिवाने सहकार्य केल्याचे निष्पन्न झाले असून या तिघांच्या विरोधेत एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 


आणि प्रकरणाला वाचा फुटली


गेल्या जून महिन्यात वस्तीगृह बंद पडल्यानंतर या वस्तीगृहात असलेल्या पाच मुलींना जळगावातील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. या मुली तिथे गेल्यानंतर त्यांची सर्वांसोबत मैत्री झाली. त्यानंतर या मुलींनी वस्तीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वस्तीगृहात असताना आपल्यासोबत तेथील केअर टेकरने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. 


गणेश शिवाजी पंडित असं आरोपीचे नाव असून वसतीगृहाचा केअरटेकर म्हणून तो कार्यरत असून त्याने वसतीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे शोषण केले. ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ म्हणजे तब्बल दहा महिन्यांपर्यंत त्याने अनेकदा पीडित मुलींचे लौंगिक शोषण केले. यात त्याने अनैसर्गिक कृत्य देखील केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


पिडीत मुलींनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याच्यासह हॉस्टेलच्या अधिक्षकाना याबाबत माहिती दिली होती. संस्थेच्या अधिक्षका आणि सचिवांना माहिती देऊन देखील त्यांनी काहीही कार्यवाही न करता गणेश पंडितला सहकार्यच केले. यामुळे त्याच्यासह आरोपीचीच पत्नी असलेल्या वसतिगृह अधीक्षका अरूणा गणेश पंडित आणि संस्थेचा सचिव भिवाजी दीपचंद पाटील या तिघांच्या विरोधात एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भादंवि कलम ३५४, ३७६ (२); ३७७; पोक्सो कायद्यातील कलम ३,४,५,६,८,९,१०,१२,१९,२१; आणि ऍट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा केअर टेकर गणेश पंडीत याला अटक करण्यात आली आहे. तसेच माहिती असूनही हे प्रकरण लपवून ठेवून गणेश पंडित याला साथ देणारी त्याची पत्नी तसेच वसतिगृहाची अधिक्षिका आणि सचिव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.