अमित कोटेचा, झी मीडिया, मुंबई : मिरा भाईंदर महापालिकेकडे मच्छर मारायला निधी नाही म्हणून काही दिवसापूर्वी धूर प्रतिबंधक यंत्रणा अर्थात फॉगिंग बंद करण्यात आले. पण याच महानगरपालिकेने स्टडी टूरच्या नावाखाली नगरसेवकांना थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी लाखोचा दौलतजादा उधळायचा चंग बांधलाय. जनता मच्छरांनी हैराण झालीय आणि सत्ताधारी कुर्गमध्ये थंड हवेच्या ठिकाणी सहकुटुंब जाण्यासाठी बेत आखतायत. विरोधकांनी या स्टडी टूरच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सहा दिवसाच्या या दौ-यासाठी तब्बल ८० लाखाच्या निधीचा महापालिकेला बसणार आहे. या दौ-यावर स्थानिकांकडून प्रचंड टीका होतेय. जनतेच्या पैशाची उधळपट्टी म्हणत १२ काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी या दौ-याला नकार देत विरोध दर्शवलाय. नागरिकांवर बोझा टाकून करण्यात येणा-या अभ्यास दौ-याच्या या उधळपट्टीवर शिवसेनेही नकार दर्शवलाय. 


काँग्रेसचा विरोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या सिमेवर झपाट्याने विकसित होणारे हे मीरा भाईंदर शहर.. उखडलेले रस्ते आणि ट्रॅफिक जॅंमच्या समस्येत नेहमी अडकलेल्या या शहराला मच्छरांनी अक्षरक्ष विळखा घातलाय. काही दिवसांपुर्वी मिरा भाईंदर महानगरपालिकेने मच्छरांना मारण्यासाठी धुर आणि औषध यंत्रणा बंद केलीय. आणि याला कारण देण्यात आले की महापालिकेकडे म्हणे निधी नाहीय.  निधी नाही म्हणून रस्त्याची दुर्दशा झालीय. आणि अनेक विकासकामेही रखडली आहेत.  पण असं असतानाही महापालिकेच्य़ा नगरसेवकांना लाखो रुपयांचा खर्च करुन कर्नाटकच्या कुर्ग या हिल स्टेशनला पाठवण्याचा नियोजन करण्यात आलंय. आणि या दौ-याला अभ्यास दौरा असं गोड नाव देण्यात आलंय.. सहा दिवसाच्या या दौ-यासाठी तब्बल ८० लाखाच्या निधीचा महापालिकेला बसणार आहे. या दौ-यावर स्थानिकांकडून प्रचंड टीका होतेय. जनतेच्या पैशाची उधळपट्टी म्हणत १२ काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी या दौ-याला नकार देत विरोध दर्शवलाय. नागरिकांवर बोझा टाकून करण्यात येणा-या अभ्यास दौ-याच्या या उधळपट्टीवर शिवसेनेही नकार दर्शवलाय.


 साडेतीनशे कोटींचे कर्ज


मीरा भाईंदर महापालिकेवर सुमारे साडेतीनशे कोटींचे कर्ज आहे.  निधी नाही म्हणून मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतही वाढ सुचवण्यात आलीय. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या या अगोदरही अनेक अभ्यास दौरे झाले. त्या सगळ्या दौऱ्यावर जाऊन नगरसेवक काय शिकले आणि त्याचा शहरासाठी काय उपयोग झाला हा नागरिकांचा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. आणि याबाबत महापौर डिंपल मेहता यांचे निरुत्तर होणं कदाचित त्या सर्व प्रश्नांचे उत्तर असेल.


 मुलभूत सुविधांचा अभाव 


सूत्रांच्या माहितीनुसार, नगरसेवक हा अभ्यासदौरा सहकुटुंब करणार आहेत. आणि म्हणूनच अगदी उन्हाळ्यात कुर्गसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाणे याला पैशाची उधळपट्टी आणि सहकुटुंब सहल म्हणून मीरा भाईंदरवासियांचा कडाडून विरोध आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपची सच्चा आहे. सुमारे १२०० कोटींचे बजेट असणारी ही महापालिका पण मुलभूत सुविधांचा अभाव आहे. आणि या सगळ्यात नगरसेवकांचा हा कुर्ग दौरा प्रचंड विरोदआचे कारण बनलाय.