पुणे : पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात एका व्यापाऱ्याने केरळच्या आंब्याचा चक्क देवगडच्या हापूस आंब्यात बदल केलाय. याचं झालंय असं की, या व्यापाऱ्याकडे आंबे विक्रीस आले होते. त्या आंब्याच्या बॉक्सवर देवगड हापूस आंबे असे लिहिले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजार समिती प्रशासनाने या आंब्याची तपासणी केली. यावेळी बाजार समिती प्रशासनाला हा आंबा केरळचा आंबा असल्याचे आढळून आले. बाजार समिती प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत संबंधित व्यापाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला.


केरळचा आंबा हा देवगडचा आंबा असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे आंबा विक्रीत गैरप्रकार आढळल्यास माल जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.


त्यानुसार समिती प्रशासनाने आडत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून एका डझनाच्या ४२ पेट्या जप्त केल्या आहेत. त्या पेट्यांची बाजार समितीने विक्रेत्यांमार्फत विक्री करून, तसेच दंडात्मक कारवाई करून बाजार समितीकडे २३ हजार ७०० रुपये जमा केले आहेत.


आंबा विक्रीत ग्राहकांची फसवणूक करू नये. असा गैरप्रकार झाल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा बाजार समिती प्रशासनाने दिलाय.