पुणे : गेल्या नऊ वर्षांपासून पुण्यातून बेपत्ता झालेला एक तरुण चक्क नक्षलवादी कमांडर असल्याचं समोर आलं आहे. संतोष शेलार उर्फ विश्वा असं त्याचं नाव आहे. २८ वर्षीय संतोष छत्तीसगड मधील नक्षली कारवायांमध्ये सक्रीय असून तांडा एरिया कमिटीचा तो डेप्युटी कमांडर आहे. छत्तीसगड पोलिसांनी नुकतीच माओवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या आरोपींची यादी जारी केली आहे. त्या यादीत संतोषचं नाव चौथ्या क्रमांकावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोषकडं थ्री नॉट थ्री रायफल देखील असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसनं एंजेला सोनटक्के, तिचा पती मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे यांच्यासह १४ जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यात संतोष शेलारचाही समावेश होता. संतोष सोबत त्याचा मित्र प्रशांत कांबळे हा देखील बेपत्ता आहे. प्रशांत देखील नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती मिळते आहे.