अखेर अशी झाली भरकटलेल्या बछड्याची आणि आईची भेट, VIDEO पाहून मन होईल प्रसन्न
साताऱ्यातील (Satara) सज्जनगडावर (Sajjangad) मंगळवारी (20 सप्टेंबर) बिबट्याच्या बछड्याचे (Leopard Cub) दर्शन झालं.
Sajjangad Leopard : सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडीओ (video) दिसतात जे पाहून आपण दिवसभरातील कामाचा ताण विसरून जातो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचं मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. अनेक दिवसांपासून मायलेकाची ताटातुट झाली होती. अखेर भरकटलेल्या बछड्याला त्याची आईची भेट झाली आहे. (missing leopard cub meets mother Sajjangad video viral on Social Media NM)
झालं असं की, साताऱ्यातील (Satara) सज्जनगडावर (Sajjangad) मंगळवारी (20 सप्टेंबर) बिबट्याच्या बछड्याचे (Leopard Cub) दर्शन झालं. सज्जनगडावरील रामघळ परिसरात काही तरुणांना बिबट्याचा बछडा खेळताना दिसला. त्यांनी बिबट्याचे फोटो आणि व्हिडीओ काढले. बिबट्याचा बछडा असल्याचं समजताच काही वेळात सज्जनगडावर गर्दी वाढली. त्यानंतर तात्काळ वनअधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाचे अधिकारी (Forest Department Officer) आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले.
हरवलेल्या बछडा आणि मोदी बिबट्याची भेट घालून देण्याचा मानस वन विभागाने घेतला आणि त्यांचा प्रयत्नाला यशही आलं. आई आणि बछड्याची (leopard cub) भेट ट्रॅप कॅमेऱ्यात (trap camera) कैद झाली आहे. हा माय-लेकाच्या भेटीचा सुंदर क्षणाचा व्हिडीओ समोर आला आहे.
आता या मादी बिबट्याने आपल्या पिल्लाला सुरक्षित अधिवासात नेलं आहे. साताऱ्याचे वनक्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण (Forester Doctor Nivritti Chavan) यांचं सहकारी आणि पुणे बावधनमधील रेस्क्यूटीम (Rescue Team in Pune Bawdhan) आणि सह्याद्री पोट्रिकस फौंडेशन (Sahyadri Potrichus Foundation) यांच्या कामगिरीला अखेर यश आलं आहे.