मुंबई : आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा सरकारला घरचा आहेर देत कायदा सुव्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजले आहेत, याचे जिवंत उदाहरण धुळे शहरात उजागर केले आहे. 


धुळ्यात सट्टा बाजार जोरात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे शहरातील अवैध धंद्यांविरूध्द सातत्याने कठोर भूमिका घेणारे भाजपचे आमदार अनिलअण्णा गोटे यांनी स्वतःच शिवाजी रोडवरील स्वामी समर्थ मंदिरासमोर आणि समांतर पुलाखाली सुरु असलेल्या दोन सट्टापेढीवर धाड टाकली. यावेळी तेथे अंक सट्टा नावाचा जुगार खेळला जात असल्याचे समोर आले. 


पोलीस पोहचत नाहीत म्हणून आमदार 


आमदार अनिल गोटे आणि त्यांच्या समर्थकांनी तेथे सट्टा खेळवणार्‍या आणि खेळणार्‍या चार ते पाच जणांना रंगेहाथ पकडले. तसेच तेथील जुगाराची साधने आणि रोकड असा ऐवज ताब्यात घेतला.


धुळे शहरातील पोलिसांनी सट्टाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचंही म्हटलं जात आहे, अखेर आमदार अनिल गोटे यांनी स्वत: जाऊन सट्टा खेळणाऱ्यांना पकडलं आहे.