Atul Bhatkhalkar demand public holiday : गेले कित्येक वर्ष ज्याची सर्वांना आतुरता होती, अशा अयोध्येतील राम मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. या दिवशी देशभरात दिवाळा साजरी केली जावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. येत्या 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली आहे. अयोध्येत श्रीरामांची प्रतिष्ठापना होणार आहे, हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी लोकांना सार्वजनिक सुट्टी (Public Holiday On 22 Jan) जाहीर करा, असं भातखळकरांनी पत्रात म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय लिहिलंय पत्रात?


महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून शतकानुशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्री राम जन्मभूमी आयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होणार आहेत. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यादिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता द्यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, तसेच खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती आहे, असं पत्र अतुल भातखळकर यांनी लिहिलं आहे. 



दरम्यान, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी देशभर सुरू आहे. प्राणप्रतिष्ठापनेचा भव्य सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. सोमवारी मृगाशिरा नक्षत्रातील मुहूर्त खास असल्याचं सांगितलं जात आहे. हा शुभमुहूर्त पुण्यातील पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी काढला आहे. भारतातील सर्व 140 कोटी बंधू-भगिनींनी 22 जानेवारीला रामलल्ला जेव्हा अयोध्येत विराजमान होतील, तेव्हा रामज्योती प्रज्वलित करावी, अशी विनंती नरेंद्र मोदी यांनी केली होती.