बच्चू कडूंचा साधेपणा, केकऐवजी टरबूज कापून साजरा केला कार्यकर्त्याचा वाढदिवस; पाहा व्हिडीओ
MLA Bacchu Kadu: कार्यकर्त्याचा वाढदिवस बच्चु कडूंनी केकऐवजी टरबूज कापून साजरा केला. पारंपारिक केक कापण्याच्या प्रथेला बगल देत साधेपणाने टरबूज कापून त्यांनी हा क्षण साजरा केला.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, आमदार बच्चू कडू हे आपली साधी राहणी आणि दिलखुलास व्यक्तीमत्वासाठी ओळखले जातात. ते नेहमी जनता आणि आपल्या कार्यकर्त्यांवर जीव लावताना दिसता. असाच एक आनंदाचा क्षण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत साजरा केला. यावेळीकार्यकर्त्याचा वाढदिवस बच्चु कडूंनी टरबूज कापून साजरा केला. पारंपारिक केक कापण्याच्या प्रथेला बगल देत साधेपणाने टरबूज कापून त्यांनी हा क्षण साजरा केला. यानंतर सोशल मीडियात त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष प्रवीण खेडकर यांचा वाढदिवस होता. त्यांनी आपला वाढदिवस प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चु कडू यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला. हा वाढदिवस प्रवीण यांच्या कायमचा लक्षात राहील, अशा पद्धतीने साजरा करण्यात आला. कारण यावेळी बच्चु कडूंनी केक न कापता चक्क टरबूज कापून वाढदिवस साजरा केला.
बच्चू कडू हे नेहमीच प्रस्थापित गोष्टींच्या विरुद्ध बंड करुन वेगळे काहीतरी करत असतात. यावेळी कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला त्यांनी केक न कापण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी टरबूज कापला. दरम्यान शहरात या वाढदिवसाची चांगलीच चर्चा रंगली होती.
बच्चू कडूंचा कार्यकर्त्यासोबत टरबूज कापतानाचा व्हिडीओ सोशल मीडित व्हायरल होत आहे. सुध्दा हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकर्यांनी या व्हीडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने टरबूज कापल्याने अनेक चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे आता याचे राजकीय काही पडसाद उमटतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.