सांगली : मुंबई बॅाम्ब ब्लास्टमध्ये शेकडो हिंदूचे जीव गेले. या बॅाम्ब ब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीम ( Daud Ibrahim ) याच्या बहिणीसोबत मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik ) यांनी आर्थिक भागीदारी केली. मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार ( Shard Pawar ) यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ( Ahilyadevi Holkar ) यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास राखण्यात आलं. हिंदू राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती म्हणजे त्यांच्या नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट त्यांना वाटतो? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( BJP MLA Gopichand Padalkar ) यांनी केला.



हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत जेव्हा हिंदू संस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती. त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी ( Punyshlok Ahilyadevi ) यांनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुकले. त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे 'अहमदनगर'चे ( Ahmad Nagar ) नाव बदलून 'अहिल्यानगर' ( Ahilya Nagar )  करण्यात यावे अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackarey ) यांनी नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नाही. स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सम्मान कराल अशी अपेक्षा आहे. बहुजन समाज जागा झाला आहे आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.