मुंबई : अमरावतीचे आयुक्त यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढला. यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या.  त्यामुळे त्यांच्यावर शाई फेक झाली. मात्र, या प्रकरणाचे आरोप आमदार रवी राणा यांच्यावर ठेवण्यात आले. त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई झाली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, जो सदस्य दिल्लीत आहे त्याच्यावर ३०७ कलम कसे लावले जाते. या राज्यात बेकायदेशीरपणे जे गुन्हे लावले जात आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.


तुमच्या राज्यात पोलीस बेछूट होत आहेत, पण पोलिस बेछूट झाले तर ते राज्यास परवडणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. 


याच विषयावरून बोलताना आमदार रवी राणा स्पष्टीकरण देताना म्हणाले, मनपा आयुक्त यांच्यावर शाई फेक झाली दिल्लीत होतो. पण, माझ्यावर गुन्हे दाखल केले. रात्री तीन वाजता दीडशे पोलिस यांनी घरात घुसून तपासणी केली. खासदार नवनीत  राणा यांना ताब्यात घेतले.


आज आर. आर. पाटील यांच्यासारखे गृहमंत्री हवे होते. गृहमंत्री यांनी तटस्थतेने काम केले होते. अधिकारी चुकीचे पद्धतीने कारवाई करत होते. त्यांना विचारले असता त्यांनी वरून आदेश आल्याचे सांगितले. 


हे आदेश कुणी दिले? त्याची माहिती मला हवी आहे. जे संभाषण झाले त्याची माहिती माझ्या पेन ड्राईव्ह मध्ये आहे.  राज्यात जर असे होते असेल तर मग राज्यात नेमके काय चालले आहे? असा सवाल करतानाच जर मी खरोखरच दोषी असेन तर फाशी घेईल. पण, असे खोटे आरोप करू नका असे रवी राणा यांनी सांगितले.