`वैयक्तिक नाती जपत राहू...` रोहित पवारांच्या आईची सुनेत्रा पवारांसाठी खास पोस्ट
Sundanda Pawar facebook Post : रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी आपल्या जाऊबाई सुनेत्रा पवारांसाठी लिहिली खास पोस्ट. वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या मनातील भावना. कुटुंबात कितीही मतभेद असले तरीही `पवार` कुटुंबिय मनाने एकच असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे. सुनंदा पवार आणि सुनेत्रा पवार यांनी नकळत सगळ्या कुटुंबातील सुनांना नाते कसे जपावे हे सांगितलं आहे.
Pawar Family : अजित पवारांनी भाजपच्या गटात जाऊन उपमुख्यमंत्री पद मिळवलं. काका आणि राष्ट्रवादीचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांच्याशी मतभेद असल्याच मान्य केलं. मात्र आपण मनाने एकत्र असल्याचं सांगितलं. असं असतानाच पवार कुटुंबातील युवा आमदार रोहित पवार यांनी काकांविरोधात अनेकदा वक्तव्य केलं. या सगळ्यामुळे राजकीय वर्तुळात कायम 'पवार' कुटुंब चर्चेत राहीलं. मात्र असं सगळं असताना सुनंदा पवार म्हणजे रोहित पवारांच्या मातोश्रींची पोस्ट व्हायरल होत आहे.
रोहित पवारांच्या आईची पोस्ट चर्चेत
रोहित पवारांची आई सुनंदा पवार यांनी आपल्या जाऊबाई म्हणजे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या साठीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, या दोन्ही सुना राजकीय वर्तुळातील चर्चेत असलेल्या कुटुंबातील आहेत. सुनंदा पवार या सामाजिक क्षेत्रात काम करतात. सुनेत्रा पवार मात्र राजकीय क्षेत्रात पडद्यामागची भूमिका साकारतात. असं सगळं असताना सुनंदा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय लिहिलंय पोस्टमध्ये
माझं सासर माहेर येथीलच,तुम्ही मराठवाड्यातील. बहुतेक स्त्रियांना सासरच्या पद्धती,संस्कृतीत समरस व्हावे लागते तसेच आपणही झालो. अनेक प्रसंग,सण एकत्र अनुभवले. आता आपण दोघींनीही साठी ओलांडली आहे. आपण राजकीय घराण्यात आहोत, चढ उतार, वादळ ही येतच रहाणार. यातूनही आपली वैयक्तिक नाती आपण जपत राहू. सुनेत्रा तुम्हाला साठाव्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..'
नाती जपणे किती महत्त्वाचे
सुनंदा पवार आणि सुनेत्रा पवार यांनी आपल्या या पोस्टमधून नाती किती जपणे महत्त्वाचं असल्याच सांगितलं आहे. संपूर्ण कुटुंब देशभरात राजकीय वर्तुळामुळे चर्चेत आहे. असं असताना सुनंदा पवार यांनी जाऊबाईंसोबतच हळुवार नातं जपलं आहे. दिवाळीमध्ये पवार कुटुंबिय बारामतीत एकत्र सण साजरा करताना दिसतात. यंदाच्या दिवाळीला देखील हेच चित्र पाहायला मिळेल का? याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. कुटुंबातील पुरुषांचे कितीही मतभेद झाले तरीही पवार कुटुंबातील महिलांनी मात्र आपली नाती जपली आहेत.