MLA Yogesh Kadam Accident News: आमदार योगेश कदम (Yogesh Kadam Accident) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा (Yogesh Kadam Car Accident) रायगड हद्दीत अपघात झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील नेत्यांच्या वाहनांचा अपघात होण्याचं सत्र सुरूच असल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुदैवाने आमदार योगेश कदम अपघातानंतर सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या चालकाला (Driver) मात्र किरकोळ दुखापत झालीये. अपघातानंतर चोळई येथील शासकीय रूग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.


अपघातात आमदार कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी मिळाली आहे. भरधाव वेगातील टँकरने आमदार कदम यांच्या गाडीला धडक दिली. मुंबईकडे येत असताना अपघात झाला. अपघातानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला. आमदार कदम यांच्या गाडीला धडक बसल्यानंतर टँकर पोलिसांच्या गाडीला धडकला. 


आणखी वाचा - Nitin Gadkari: 'बाळासाहेबांनी मला एक वाक्य लिहून दिलं होतं...'; अधिकाऱ्यांच्या 'मालपाणी'वर गडकरींचा प्रहार!


दरम्यान, टँकर गाडीला धडकल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मागील काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या गाडीच्या अपघाताची मालिका सुरू असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणं टाळा, अशी विनंती करण्यात येत आहे.