Sharad Pawar On Ajit Pawar : शिंदे फडणवीस सरकराच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार ( Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची (Sharad Pawar) शपथ घेतली. यानंतर जाहीर पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी थेट राष्ट्रावादी पक्षावर दावा केला आहे. आकडा सांगायची गरज नाही पण राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद यांनी देखील या बंडखोरीबाबत खळबळजनक दावा केला आहे.  सह्या घेवून आमदारांना सहभागी करुन घेतले असा आोरपच शरद पवार यांनी केला आहे. 


शरद पवार यांचा खळबळजनक आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या काही सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका ते मांडत आहेत. पक्षाचे सदस्य हे विधीमंडळाचे सदस्य देखील आहेत. ज्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली आहेत. ज्यांची नावे समोर येत आहेत. त्यांनी आजच आमच्याशी संपर्क साधला होता. आमच्याकाडून सह्या घेतल्या आम्हाला यात सहभागी करुन घेतले असे सांगितल्याचा खळबळजनक दावा शरद पवार यांनी केला. त्यांनी अशी भूमिका का घेतली? येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल असे शरद पवार म्हणाले. या सर्व घाडमोडी घडण्याआधी छगन भुजबळ यांनी मला संपर्क केला होता. मी तुम्हाला नंतर कळवतो असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे समजले असे शरद पवार यांनी सांगितले.   


पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी पक्षाला भष्ट्राचाराच्या आरोपांमधून त्यांना मुक्त केले


राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्ट्राचारामध्ये सापडलेला पक्ष आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. राष्ट्रवादी पक्षाच्या काही नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान देऊन. राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षातील नेत्यांवर केलेल्या भष्ट्राचाराच्या आरोपांमधून त्यांना मुक्त केले. याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानतो असेही शरद पवार म्हणाले.


राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदार अजित पवारांसह राजभवनात दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबतच छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे यांनीही शपथ घेतली.