Maharashtra MLC Election Results 2023 Updates : अमरावतीत भाजपला मोठा झटका बसला आहे. (Amravati Graduate Constituency) अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे विजयी झाले आहेत. (Maharashtra Political News in Marathi) भाजप उमेदवार रणजित पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. (Maharashtra News in Marathi) अमरावती विभागात हा भाजपला मोठा झटका मानला जात आहे. लिंगाडे यांना 46344 मते मिळाली आहेत. तर भाजप उमेदवार रणजित पाटील यांना 429562 मते पडलीत. लिंगाडे यांचा 3382 मतांनी विजय झाला आहे. ( Amravati Election Results 2023 )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 अमरावतीत घमासान, भाजप - काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची


अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून उमेदवार अरुण सरनाईक बाद झालेत. आतापर्यंत 19 उमेदवार बाद झालेत. तर धिरज लिंगाडे यांना 44 हजार 448 तर डॉ. रणजीत पाटील यांना 41 हजार 896 मते पडली होती. त्यामुळे कोटा (47 हजार 101 मते ) पूर्ण नसल्याने सद्य:स्थितीत सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराची (डॉ. प्रवीण चौधरी, 1 हजार 774 मते ) दुसऱ्या पसंतीची मत गणना सुरु होती. त्यानंतर मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर लिंगाडे हे आता विजयी झाले आहेत.


विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या पाच मतदारसंघांतील निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रभाव असलेल्या नागपूरमध्ये शिक्षक मतदारसंघाची हक्काची जागा भाजपने गमावली. निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचं चित्र आहे. अमरावतीमध्ये भाजप उमेदवार पिछाडीवर होता. तिथे महाविकास आघाडीने भाजपवर मात केली आहे.


 भाजपने इतरांची घरं फोडली - नाना पटोले


 भाजपने इतरांची घरं फोडली ते आता भाजपला भोगावं लागतंय अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अमरावती नागपूरमध्ये भाजपच्या जाचामुळे अनेक नाराज भाजप नेत्यांनी काँग्रेसला मदत केली असं नाना पटोले म्हणाले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युततर दिलंय. घर फोडण्याची परंपरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आहे, पाठीत कोणी खंजीर खुपसला यावर एक पत्रकार परिषद घ्यावी लागेल असं पाटील म्हणाले.


भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची 


दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काल मध्यरात्री दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्यासमोर जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजप उमेदवार रणजीत पाटील मतमोजणी केंद्राबाहेर निघून गेले.