बीड : परळीत भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. हे कार्यकर्ते भिडल्याचे सांगण्यात येत आहे. मनसे कार्यकर्ते पंकजा मुंडे यांच्या घराकडे जाताना पोलिसांनी रोखले. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी पंकजा मुंडे यांचे समर्थकसुद्धा या ठिकाणी जमले आणि त्यांनीही 'पंकजा मुंडे जिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच परीस्थितीवर नियंत्रण मिळवले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे या चेअरमन असलेल्या पनगेश्वर शुगर मिल्स साखर कारखाण्याचे मागच्या वर्षाचे वैधानिक किमान मूल्य अर्थात एफआरपी शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यासोबतच ऊसतोड मुकादम नाही. त्यांचे पैसे मिळाले नाहीत. म्हणून मनसेने सोमवारी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी मनसेचे कार्यकर्ते हे परळी शहरातील शिवाजी चौकामध्ये एकत्र झाले होते. यावेळी तणावाचे वातावरण दिसून आले. 


पंकजा मुंडे यांच्या ‘यशश्री’ या निवसास्थानासमोरच हा सर्व प्रकार घडला. मनसे कार्यकर्ते शिवाजी चौकातून पंकजा मुंडे यांच्या घराकडे जाताना पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच बैठक मारली. यावेळी पंकजा मुंडे यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी जमले आणि त्यांनीही 'पंकजा मुंडे जिंदाबाद'च्या घोषणा देण्यास सुरुवात केले. त्यानंत मनसे कार्यकर्तेही आक्रमक झालेत. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच परीस्थितीवर नियंत्रण मिळवले.


भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांच्या दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.