आतिष भोईर, डोंबिवली : सहा महिने उलटूनही गुंतवणूकदारांना परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. डोंबिवलीत काही वर्षांपूर्वी गुडविन ज्वेलर्स आणि प्रथमेश ज्वेलर्सने गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा घातला होता .या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे ही दाखल होते. त्या पाठोपाठ आता डोंबिवलीतील VGN ज्वेलर्सने देखील गेल्या आठ महिन्यांपासून गुंतवणूकदाराना परतावा न दिल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत गुंतवणूकदारांनी व्हीजेएन ज्वेलर्सकडे परतावा मागितला मात्र वारंवार उंबरठे झिजवून देखील दिलेल्या तारखांना पैसे मिळाले नाहीत. याबाबत गुंतवणूकदारानी मनसेकडे धाव घेत गार्हाणे मांडले.


आज मनसे पदाधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांसह थेट व्हीजेएन ज्वेलर्स गाठलं आणि जाब विचारत गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याची मागणी केली. यावेळी  व्हीजेएन ज्वेलर्सच्या मॅनेजमेंटची मनसे पदाधिकारी आणि गुंतवणूकदारांसोबत बैठक झाली. या बैठकीत ज्वेलर्सच्या वतीने आम्ही कुणाची फसवणूक करणार नाही. लॉकडाऊन मुळे आर्थिक संकट आहेच. 


मात्र येत्या काही महिन्यात डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे आश्वसन दिले आहे. यावेळी मनसेच्या वतीने दिलेल्या मुदतीत पैसे परत करा अन्यथा पुन्हा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.