पुणे :  मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.आज या पक्षाला 15 वर्ष पूर्ण होऊन आज 16 व्या वर्षात पदार्पण करीत आहे . दरवर्षी मुंबईत होणारा,वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच इथं पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होत आहेत याबद्दल शुभेच्छा देत आगामी काळात मनसे जोरदार लढेल, याची खात्री देतो अशी गर्जना राज ठाकरे यांनी यावेळी केली. 


राज्यापालांचा घेतला समाचार


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. 
आमच्या राज्यपालांना समज बिमज काही आहे का, त्यांना पहिल्यांदा भेटायला गेलो, असं सांगत राज ठाकरे यांनी राज्यपालांची नक्कल करुन दाखवली. मी त्यांना शेकहँड केलं त्यानंतर मला असं वाटलं की ते आता माझा हात बघून भविष्य सांगतील. कुडमुडे ज्योतिष असतात तसं.



आपला अभ्यास नसताना फक्त बोलायचं, कुठल्याही पत्रात नाही की छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींचे शिष्य होते. नुसती भांडणं लावायची. त्यातून बोध घ्यायचा नाही.  आमच्याच महापुरुषांना बदना करायचं आणि तुमची माथी फिरवून मतं मिळवायची एवढाच उद्योग सुरु आहे सध्या. 


महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची लहानपणी लग्न झाल्याचं राज्यपालांनी कुठल्यातरी भाषणात सांगितलं, तेव्हा लहानपणी लग्न व्हायची, पण तुमचं अजून नाही झालं. नको तिथे बोटं घालायची यांना सवय लागली आहे, असं सांगत राज ठाकरे यांनी राज्यपालांची खिल्ली उडवली.