Raj Thackeray in Beed : परळी कोर्टात हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray) रवाना झालेत. सकाळी अकरा वाजता ते हेलिकॉप्टरने बीडच्या गोपीनाथ गडावर  (Gopinath Gad) दाखल होतील. तिथून ते साडेअकरा वाजता वॉरंट रद्द करण्यासाठी कोर्टात हजेरी लावतील. ( Maharashtra Political News)


राज ठाकरे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. मराठी पाट्या आणि मराठी मुद्द्यावर आंदोलन केल्यानंतर बळजबरी दुकानं बंद करणं, दुकानं बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडणं याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना दोन वेळा अटक वॉरंटही जारी केलं होतं.


सुनावणीच्या तारखेला सतत गैरहजर, अजामीनपात्र वॉरंट 


राज ठाकरे हे बसवर दगडफेक केल्या प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने त्यांना अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणात जामीन मिळविसाठी ते आज (Parli) परळी कोर्टात हजर राहणार आहेत.  त्यानंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुपारी दीड वाजता ते परत मुंबईला रवाना होणार होतील.


2008 मध्ये मध्ये राज‎ ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत‎ अटक करण्यात आल्यांनतर या‎ अटकेचे पडसाद बीडमधील परळी येथेही उमटले‎ होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎



राज ठाकरे यांच्यावर पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल‎ केले होते. त्यानंतर हे प्रकरण परळीच्या‎ न्यायालयात गेले. परळी न्यायालयाच्या सुनावणीला सातत्याने राज ठाकरे हे गैरहजर‎ राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध‎ अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.‎ याआधी 3 आणि 12 जानेवारीला राज ठाकरे यांना परळी‎ न्यायालयात हजर राहण्यास‎ सांगितले होते. परंतु काही कारणामुळे ते येवू शकले नव्हते. त्यामुळे ते आज सकाळी ते परळी न्यायालयात हजर होणार आहेत.