Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती. राज ठाकरे यांची ठाकरी तोफ कोणावर धडाडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आपल्या सभेत सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभा होणार, नाही होणार, राज ठाकरेंनी सभा घ्यावी, नाही घ्यावी, परवानगी मिळणार, नाही मिळणार अशी चर्चा सभेआधी सुरु झाली. हे का केलं मला कळलं नाही, महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात मी सभा घेतली असती तर तुम्ही पाहिलीच असती ना.


मुंबईला गुढीपाडव्याला एक सभा घेतली. त्या सभेनंतर बरेच जण बडबडायला लागले. त्यांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात उत्तर सभा घेतली, या दोन सभेवर किती बोलतायत असा टोला राज ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.


ठाण्याची सभा झाली त्यावेळी ठरलं की संभाजीनगरही एक सभा घेऊया. हा तर महाराष्ट्राचा मध्य आहे. हा विषय केवळ संभाजीनगरपूरता मर्यादीत नाही. यापुढे सर्व सभा मराठवाड्यात घेणार आहे. विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही सभा घेणार आहे अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली


ऐतिहासिक संभाजीनगरमध्ये जी काय उरली सुरली आहे ती आता इथे काढू असं सांगत राज ठाकरे यांनी इशारा दिला. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याची मला कल्पना आहे. पण प्रमुख मुद्द्यांवर बोलणं गरजेचं आहे. 


महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र समजून घेणं गरजेचं आहे. जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.