Raj Thackeray Rally in Dombivli: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली. राज ठाकरे यांची आज पहिली सभा पार पडली. डोंबिवलीतून (Dombivli) त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांवरही टीका केली. 


'बाळासाहेबांच्या नावामागील हिंदुह्रयदसम्राट उपाधी काढून टाकली'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"वेगळ्या विचारांची युती, आघाडी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह गेल्यानंतर लाजिरवाणी गोष्ट म्हणजे सगळ्या फोटोंवरुन बाळासाहेबांच्या नावामागील हिंदुह्रयदसम्राट उपाधी काढून टाकली. कोणी त्यांचा हिंदुह्रयदसम्राट उल्लेख करण्यास तयार होईना. शिवसेनेच्या होर्डिंगवर फोटो, पण हिंदुह्रयदसम्राट नाही. काही तर उर्दू पाहिले आहेत. ज्यात जनाब असं लिहिलेलं असायचं. स्वार्थासाठी. खुर्चीसाठी इतके खालपर्यंत गेलात तुम्ही. मध्यंतरी विधानसभेत गेलो होतो. सर्व आमदार तिथे बसले होते. मी त्यांना बाळासाहेबांचं एक तैलचित्र विधानभवन आणि परिषदेच्या गॅलरीत लावा असं सागितलं. जेणेकरुन त्यातील आमदारांना आपण पायरी कोणामुळे चढलो हे कळेल".  


'माझे कितीही मतभेद असले तरी शरद पवार...', पहिल्याच सभेत राज ठाकरेंचं मोठं विधान, 'शिवसेना उद्धव ठाकरेंची...'


 


'शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही'


"या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणाचे आदय शरद पवार आहेत. 78 ला काँग्रेस, 92 ला शिवसेना, 2005 ला राणेंना फोडलं. आता सगळं प्रकऱण पुढे गेलं आहे. आता पक्ष, चिन्ह, नाव ताब्यात घ्यायचं. असं मी कधी पाहिलं नव्हतं. अजित पवार, एकनाथ शिंदेंनी पक्ष, नाव, चिन्ह घेतलं. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही. ती बाळासाहेबांची आहे. त्याला कशाला हात घालताय. तुमच्या स्वार्थासाठी आमदार फोडाफोडीच राजकारण करायचंय ते करा. माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य आहे, अजित पवारांचं नाही. महाराष्ट्रात वैचारिक घसरण इतकी झाली आहे.माणसं पळवली जात आहेत. ज्या महाराष्ट्रकडे सुसंस्कृत, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र म्हणून पाहिलं जातं, त्या महाराष्ट्राला उत्तर प्रदेश, बिहार करायंच आहे का?," अशी विचारणा राज ठाकरेंनी केली. 


'आता देवच महाराष्ट्राला वाचवेल'


"महाराष्ट्रातील तरुण रोजगार मागत आहे, शेतकरी आत्हमत्या करत आहेत आणि यांची मजा सुरु आहे. हे असे वागतात कारण तुम्ही चिडत नाही. शांत थंड लोण्याच्या गोळ्यासारखे बसलेले असता. वारंवार यांना मतदान करता म्हणून पर्वाच नाही. त्यांनी गृहित धरलं आहे. महाराष्ट्रातील जनता काय उखाडणार? निवडणुकीत पैसे फेकून मारु, परत रांगेत उभे राहून आम्हाला मतदान करतील, मग कसे ही वागू असा विचार ते करतात. तुम्ही हा समज मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्र, हे लोक वठणीवर येणार नाहीत. कोणी कोणासोबतही जत आहे. लाजही वाटत नाही, महाराष्ट्र असा कधी नव्हता. अशा प्रकारे गद्दारी केलेले मी पाहिले आहेत. मान खाली घालून जायचे. त्यांना लोकांची भिती वाटायची. पण आता काहीच वाटत नाही. आता देवच महाराष्ट्राला वाचवेल," अशी हतबलता राज ठाकरेंनी व्यक्त केली.