पुणे : संपूर्ण राज्यभरात मनसे (MNS) कार्यकर्त्यांना नोटीस द्यायला सुरुवात झाल्यानंतर पुण्यातील अनेक मनसेचे नेते नॉटरिचेबल आहेत. तर चार दिवसाच्या देवदर्शनासाठी वसंत मोरे (Vasant More) बालाजीला रवाना झाले आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांनी भोंग्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसंत मोरे (Vasant More) यांना यानंतर शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी ठाण्याच्या सभेत सर्वात आधी भाषण ही केले होते.


वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे सर्वात मोठे नेते मानले जातात. वसंत मोरे आता भोंग्याच्या विरोधात आंदोलनाआधीच बालाजी (Balaji) दर्शनासाठी रवाना झाले आहेत. 


राज ठाकरे यांच्या विरोधात देखील औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. जो आज संपत आहे. 1 मे रोजी झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी आपली भूमिका कायम असल्य़ाचं म्हटलं होतं. 3 मे नंतर भोंगे काढले नाही तर हनुमान चालिसा लावणार असा इशारा त्यांनी दिला होता.


राज ठाकरे यांच्या या इशाऱ्य़ानंतर आता राज्यात तणावाचं वातावरण आहे. अभी नही तो कभी नही अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.