वाढीव वीज बिलविरोधात मनसेचा एल्गार, औरंगाबाद येथे राडा
मनसे (MNS) वीज बिल माफीसाठी (Electricity Bill) आक्रमक झाली आहे. वीज बिलविरोधात मनसेने राज्यात एल्गार सुरु केला. मुंबईत भव्य मोर्चा काढला तर औरंगाबादमध्ये पोलिसांशी राडा पाहायला मिळाला.
मुंबई, पुणे, औरंगाबाद : मनसे (MNS) वीज बिल (Electricity Bill) माफीसाठी आक्रमक झाली आहे. वीज बिलविरोधात मनसेने राज्यात एल्गार सुरु केला. मुंबईत भव्य मोर्चा (MNS March) काढला तर औरंगाबादमध्ये पोलिसांशी राडा पाहायला मिळाला. औरंगाबादमध्ये मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही मोर्चा काढण्यात आला. पुण्यात मोर्चाला परवानगी न दिल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आली. पुण्यात मोर्चाला सकाळी सुरूवात झाल्यावर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवले. तर नाशिकमध्ये महामोर्चा काढण्यात आले.
वाढीव वीज बिलावरून मनसे आक्रमक झाली. राज्यभरात विविध शहरात मनसेनं वाढीव वीजबिलाविरोधात महामोर्चाचं आयोजन केलो होते. मुंबईत मनसेने भव्य मोर्चा काढला. यावेळी मनसे नेत्यांनी राज्य सरकारवर प्रचंड तोंडसुख घेतले. वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसे आज राज्यभर आंदोलन करत आहे. मुंबईत आंदोलनाला सुरुवात झाली. वांद्रे इथं मनसेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पुण्यात मोर्चाला सकाळी सुरूवात झाल्यावर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवले. पुण्यात पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरूवात केल्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुण्यातही शनिवार वाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार होता. कार्यकर्ते, पदाधिकारी या मोर्चासाठी आग्रही होते त्यामुळे अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलन करू न देणे लोकशाहीला मारक असून छुप्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचं शहराध्यक्षांनी सांगितले. दरम्यान मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना चकवा देत मोटरसायकल रॅली काढली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पुन्हा ताब्यात घेतले.
तर औरंगाबादमध्ये मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरूवात केल्यावर आंदोलक आणि कार्यकर्ते यांच्या झटापट होत असल्याचं दिसून आले. यातून मोर्चा काढला तर पोलीस आंदोलकांना ताब्यात घेईल असा इशारा पोलिसांनी दिलाय. मोर्चेकऱ्यांनी परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याने पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे पोलिसांची आणि मोर्चेकऱ्यांची झटापट झाली. मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तर ठाण्यातही मोर्चा काढण्यावर आंदोलक ठाम आहेत. नाशिकमध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं. स्थानिक नागरिकांनाही मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत होते. लॉकडाऊन काळात आवाच्या सव्वा वीज बिले आल्या मुळे नागरिकाना आर्थिक झळ सोसावे लागले आहे. वाढीव वीज बिला संधार्भात मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर न जाऊ देता मनसेला थांबवण्याचे काम पोलीस करणार आहे आणि नोटिसाला जुमानले नाही तर त्यांना कादेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्त देखील वाढवला आहे. तसेच मनसैनिक देखील नौपाडा या ठिकाणच्या कार्यालयाकडे एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे.