मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांची `चाय पे चर्चा`
साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहे.
पुणे : मनसेचे नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी माजी शराध्यध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांची कात्रज येथे भेट घेतली आहे. मुंबईत राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची नियुक्ती केल्यानंतर साईनाथ बाबर यांनी वसंत मोरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागली आहे. भेटीदरम्यान वसंत मोरे यांनी साईनाथ बाबर यांना शुभेच्छा दिल्या आहे.
कात्रज येथे साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांनी भेटीदरम्यान चाय पे चर्चा ही केली.
राज ठाकरे (Raj Thackray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. भोंगे जर काढत नसतील तर त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्याचा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांना मनसेच्या पुणे शहर अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे.