पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; मनसेचे पदाधिकारी उद्धव ठाकरेंसोबत
Uddhav Thackeray : राज ठाकरे यांना जबरदस्त झटका बसला आहे. मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.
Uddhav Thackeray Criticise Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा दारुण पराभव झाला. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र निर्माण सेनेने 100 पेक्षा अध्क उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मनसेचा एकही उमेदवार निवडूण आला आहे. राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका बसला आहे. मनसेच्या मुंबईतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधले.
मुंबईतील घाटकोपरमधील मनसेचे माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर पक्ष प्रवेश करत शिवबंधन बांधलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पराभव ज्याला जिव्हारी लागतो तो उद्याचा इतिहास घडवतो असं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.
निकाल लागल्यानंतर तुम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहेत. जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोष नाही याचा अर्थ त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही.तुम्ही सगळे एकत्र आलात योग्य वेळी आलात. जिंकल्यानंतर सर्व येतात हारल्यानंतर कोणी येत नाही.ज्याला पराभवाची खंत असते तो उद्याचा इतिहास घडवतो. आपल्याला तो इतिहास घडवायचा आहे असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
आपली हक्काची मुंबई ही ओरबाडून टाकली जात आहे . मुंबई ही मराठी माणसांची आहे का? शिवसेना हे नाव दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन काहीही फायदा नाही. आपण असताना त्यांची गरजही नाही, असं विधान रामदास आठवले यांनी केलंय... विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची हवा गेली, असा टोला लगावत नाशिकमध्ये आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं.