पुणे : Raj Thackeray Sabha in Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे उद्या कुणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या सभेची पुण्यात जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची पुण्यात सभा (Pune Rally) होणार की नाही याबाबत विविध चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे.  राज ठाकरे यांची सभा पुण्यात होणार आहे. पुण्यात उद्या 22 ला ही सभा होणार अशी माहिती मनसेvs दिली आहे. (Raj Thackeray Pune Rally updates)


मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उचलून राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता पुण्यात सभा होणार आहे. दरम्यान, पुण्यातील नियोजित सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राज पुण्यात सभा घेणार की नाही, याची उत्सुकता होती. आता सभेसाठी चाचपणी करण्यात आली आहे.


राज ठाकरे यांची सभा 22 तारखेला 10 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे होणार आहे, अशी माहिती मनसेचे प्रवक्ते हेमंत संभुस यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्माण झालेला गोंधळ अखेर शमला आहे.