पुणे : MNS Pune City Vice President Resigns : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठी गळती लागण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भोंग्यांबाबतच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेत मोठ्या घडामोडी घडत आहेत. मनसेचा पुण्यातील प्रमुख चेहरा असलेल्या वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले असतानाच आता आणखी एका पदाधिकाऱ्यांने राजीनामा दिला आहे. शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनीसुद्धा मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे शाखा अध्यक्ष माजीद शेख, मनसेचे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आज मनसे शहर उपाध्यक्ष आझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला. आतापर्यंत पुण्यातील मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मनसेला गळती लागली आहे. दरम्यान, वसंत मोरे यांनी शिवसेनेतून थेट ऑफर आल्याने आता वसंत मोरे काय निर्णय घेतात, याचीच उत्सुकता आहे.


दरम्यान, काल राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांच्या जागी तात्काळ  साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. परंतु पुण्यातून मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनी मनसेचा राजीनामा दिला. सय्यद यांनी नवनिर्वाचित शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना राजीनामा पत्र पाठवले आहे. त्यांनंतर त्यांनी सोशल मीडियावर फेसबुक पोस्टही लिहिली आहे.